राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जिल्ह्याधिकारी मंजुलक्षुमी मैडम व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिव्हील सर्जन डॉ श्रीपाद पाटिल यांची सदीछ भेट घेतली व जिल्ह्यातील जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्या संदर्भात चर्चा केली.राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हावासीयांना अपेक्षित विकासकामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कटिबद्ध आहेत.प्रशासनाने त्यासाठी तत्पर साथ द्यावी असे आवाहन अबिद नाईक व काका कुडाळकर यांनी केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सिव्हील सर्जन यांनी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यावेळी माजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस,राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावळाराम अनावकर ,राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य उदय भोसले, कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,सुनील भोगटे, माजीराष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,, माजीराष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी उपसभापति आर के सावंत, माजी उपसभापति नाथा मालंडकर,राष्ट्रवादी अल्पसंख्यक प्रदेश महासचिव शफीक खान,असलम ख़ातिब, शैलेश लाड, राजू धारपवार,व्ही जे एन टी जिल्हा अध्यक्ष अशोक पवार आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!