सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष जोमाने वाढवणार

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाईक, कार्याध्यक्ष कुडाळकर यांचा विश्वास

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष संघटना जोमाने वाढवायची आहे. पक्षसंघटना वाढीसाठी आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न करणार आहोत आणि मजबूत पक्ष संघटना बांधणार आहोत. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि मी जिल्ह्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आज येथे व्यक्त केला. आगामी काळात जिल्ह्यातील एक विधानसभेवर आम्ही दावा करणार आहोत. मात्र हे करताना आमचा महायुतीच्या नेत्यांना किंवा आमचे नेते अजित पवार यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असाही शब्द त्यांनी यावेळी दिला. आज या ठिकाणी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.यावेळी अविनाश चमणकर, उदय भोसले, सुरेश गवस, रामानंद शिरोडकर, सत्यजित देशमुख, रणजित सावंत, गुरुदत्त कामात,संदीप राणे, धर्माजी गावडे, रोहन परब, तुषार भोसले, धनराज चव्हाण, विजय कदम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!