कुणकेश्वर मध्ये अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी

देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील अनधिकृत वाळुचे उत्खनन केले जात आहे. याकडे महसुल विभागपुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी लगतच समुद्र भागाकडील असलेल्या वाळुचे अनधिककृतपणे उत्खनन केले जात आहे.
देवगड तालुकयामध्ये बहुतांश समुद्र किनारी गावांमधील अनधिकृत वाळु उत्खनन केले जात आहे. हि वाळु बाहेरच्या ठिकाणी विक्री केली जात असल्याचेही बोलले जात आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी वाळु उत्खनन केले जात आहे. मोठया प्रमाणातवरती वाळु वाहतुकिने बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत आहे. याकडे तात्काळ महसुल विभागाने दखल घ्यावी अशी मागणी कुणकेश्वर ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!