आ.नितेश राणेंच्या संकल्पनेतून फणसगावमध्ये शालेय गरजू मुलींना सायकल वाटप

देवगड (प्रतिनिधी): माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा हीच ईश्वरसेवा या उद्देश्याने आपण समाजाच देण लागतो व सेवा करण्याची संधी मिळते म्हणूनच देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक शाळेत लांब पल्ल्याच्या दुर्गम गावातील शालेय विद्यार्थी मुलींना ४/६ किलोमीटर अंतर कापून शाळेत पायी यावे लागते ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सव निमित्त त्या गरजु शालेय विद्यार्थीनींना भाजपा ओबीसी मोर्चा मुंबई तर्फे सायकलीचे वाटप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निमंत्रित सदस्य बाळा खडपे व भाजपा द .मुंबई उपाध्यक्ष व भा . ओ . मो. मुंबई सचिव विजय घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले , त्याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते भाजप पदाधिकारी महेश नारकर , पडेल चे सरपंच भुषण पोकळे , वाघिवरे / वेळगिवेचे सरपंच राजन लाड , उदय पाटील माजी उपसरपंच फणसगाव , कृष्णकांत आडिवरेकर माजी ग्रा. प. सदस्य फणसगाव , महेश पडवळ माजी ग्रा.पं.सदस्य, संतोष चव्हाण – संस्था सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका अरूधंती गोखले मॅडम, उपस्थित शालेय विद्यार्थी,भाजप कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ, हा शालेय कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ज्यांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला त्यांचे विशेष आभार मानले गेले.

        केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा भांडाफोड करण्यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज  कुडाळ शिवसेना शाखेसमोर व माणगाव बाजार येथे   "होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!" हे अभियान संपन्न झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

      यावेळी उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत.ना महागाई कमी झाली, ना रोजगार वाढला, ना भ्रष्टाचार कमी झाला. अदानी आणि अंबानी मात्र जगातील श्रीमंत व्यक्ती  झाले.राज्यातील प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. पेट्रोल, डिझेल,गॅस, टॉमेटो,तूरडाळ इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.  कोणत्याही राज्यात इतर पक्षाचे सरकार आले कि सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून, शर्तीचे प्रयत्न करून ते सरकार पाडायचे आणि भाजप सरकार आणायचे हेच काम भाजप पक्षाने केले आहे. सत्तेची हाव त्यांना झाली आहे. संविधान टिकले पाहिजे तर भाजपला सत्तेतून हटविलेच पाहिजे.कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना मोदींच्या विरोधात दिल्लीत उपोषण करावे लागले हि शोकांतिका आहे.  

   आमदार वैभव नाईक म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेऊ, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण देऊ, रोजगार मिळवून देऊ,शासकीय भरत्या करू अशी एक ना अनेक आश्वासने भाजपने दिली मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था नांदेड पेक्षा वेगळी नाही.रुग्णालयात औषध खरेदीच केलेली नाही.चिपी विमानतळ बंद केले जात आहे.  गावागावातील छोट्या रस्त्यांसाठी आवश्यक असलेला निधी राणेंनी आपल्या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वळवला. बेरोजगारी वर सरकार चक्कार शब्द काढत नाही.दिड लाख शासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे कंत्राट भाजप आमदारांच्या आणि निकटवर्तीयांच्याच ९ कंपन्यांना दिले आहे. ५ वर्षानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल. ४०० पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लाखो रुग्णांना बरे करण्याचे काम झाले. शिंदेचे आमदार त्यावेळी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना  कंटाळून सत्तांतर केल्याचे सांगतात मात्र आज अजित पवार यांच्याच मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली.

      जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर म्हणाले, ९ वर्षाच्या सत्तेच्या काळात भाजपने काहीच काम केले नाही. केवळ जाहिरात बाजी करून खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली.भाजपने केलेली नोटबंदी देखील फसली. २ हजारच्या नोटांमुळे अधिक भ्रष्ट्राचार झाला.जिल्ह्यातील  एका  गावातील देखील भाजपने बेरोजगारी कमी केली नाही. सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करून त्या अदानी, अंबानींना विकल्या जात आहेत. एडी सीबीआयची भीती दाखवून पक्ष प्रवेश करून घेतले जात आहेत. आपले शिवसैनिक कट्टर आहेत ते भाजपच्या धमक्यांना आणि आमिषांना भुलणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    जिल्हाप्रमुख संजय पडते,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला. 

        कुडाळ शहर येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट,माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,नगरसेवक उदय मांजरेकर,नगरसेविका  श्रेया गवंडे, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, सई काळप,सचिन काळप,राजू गवंडे दीपक आंगणे, आबा मुंज आदी.  
       माणगाव येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, महिला तालुका प्रमुख मथुरा राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, रामा धुरी,विभाग संघटक कौशल जोशी, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, पप्पू म्हाडेश्वर, रमाकांत धुरी, अशपाक कुडाळकर, कालेली सरपंच आरोही चव्हाण, घावनळे सरपंच आरती  वारंग,माजी उपसरपंच दिनेश वारंग,  वसुली सरपंच अजित परब,उपसरपंच गवस, शिवापूर उपसरपंच महेंद्र राऊळ, नेरूर क नारुर उपसरपंच परब,सद्गुरू घावनळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!