आमच्या महायुती सरकारने कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केला
भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांनी पुरावेच केले सादर
देवगड (प्रतिनिधी): राज्यात कंत्राटी भरती लागू करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्याच काळात घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निर्णयावर सही करून शिक्कामोर्तब केले होते असे पडेल मंडल भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा लेखी पुरावाच डॉ तेली यांनी यावेळी सादर केला.राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करून शासकीय यंत्रणेचे खाजगिकरण करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा होता.महायुती सरकारने हा डाव उधळून लावत कंत्राटी भरतीचा अध्यादेश च रद्द केला आहे. याबाबत ची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली असल्यामुळे महायुती सरकारची बदनामी करणारे विरोधक तोंडघशी पडल्याचेही डॉ.तेली यांनी म्हटले आहे.











