पोलीस पाटील दाखला कागदपत्रांबाबत अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा

कणकवली शहरासाठी पोलीस पाटील पद झालेय रद्द

माजी नगराध्यक्ष समीर नलावडें चे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरा करिता यापुढे पोलीस पाटील हे पद कार्यरत राहणार नसून, शासनाच्या आदेशानुसार ज्या शहर किंवा गावांमध्ये पोलीस स्टेशन किंवा पोलीस दूरक्षेत्र आहे अशा ठिकाणी पोलीस पाटील भरती केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना पोलीस पाटील संदर्भातील कागदपत्र किंवा दाखले आवश्यक असल्यास याबाबत प्रशासकीय पातळीवर योग्य माहिती दिली गेली नाही तर कणकवलीत समीर नलावडे संपर्क कार्यालय कन्झ्युमर्स सोसायटी जवळ येथे संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. शासनाच्या आदेशानुसार ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये पोलीस स्टेशन आहेत तेथे पोलीस पाटील भरती यापुढे होणार नाही. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याशी या बाबत देखील चर्चा करण्यात आली अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली. अनेकदा वारस तपास किंवा अन्य कामकाजा करिता पोलीस पाटील दाखल्याची आवश्यकता भासते. अशावेळी आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा लागणार आहे. याबाबत कणकवली शहरातील जनतेला कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!