धामापूर येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ग्रामपंचायत धामापूर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांचे यशस्वी आयोजन

चौके ( प्रतिनिधी ) : धामापूर सरपंच सौ. मानसी महेश परब यांच्या संकल्पनेतून धामापूर ग्रामपंचायत व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी धामापूर ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित रक्तदान शिबीरास पंचक्रोशीतील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तत्पूर्वी धामापूर सरपंच सौ. मानसी परब यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सरपंच सौ. मानसी परब यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, मालवण पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र परब , डॉ. सुमित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश परब , योगेश राऊळ , संतोष सावंत, प्रा. महेश धामापूरकर , भाऊ नार्वेकर उपसरपंच रमेश निवतकर , सदस्य प्रशांत गावडे , तेजस्विनी भोसले , स्वप्निल नाईक , आरोग्य सेविका श्रीमती शेवडे , ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर , माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा परब , सुर्यकांत नाईक , वर्षा मेस्त्री , रुपा घाडी , दादा नाईक , सूर्यकांत नाईक , अविनाश निकम , बाबू तोरसकर , दर्शन परब , सिद्धेश परब , अमोल परब , तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप चव्हाण, गणेश फोपळे , सिद्धी परब , स्वप्निल जुवेकर, सुशिल घाडी , विपुल माळगांवकर , आदी जण उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांनी रक्तदान शिबीरादरम्यान भेट देउन सरपंच सौ. मानसी परब आणि ग्रामपंचायत सदस्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!