‘ स्वच्छंद ‘ पुस्तकाचे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने वितरण

विद्या कुलकर्णी यानी दिलेल्या ५० हजार रुपये देणगीतून ८ हायस्कूलना वाटप

मसुरे (प्रतिनिधी): “स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य (भाग १ ते ३)” या पुस्तकांचा वितरण सोहळा पुस्तकांच्या लेखिका विद्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा सभागृहात संपन्न झाला.विद्या कुलकर्णी यानी दिलेल्या ५० हजार रुपये देणगीतून ८ हायस्कूलना पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी शोभा कर्णिक व रोटरी क्लब मुंबई माहीमच्या सदस्या संध्या समुद्र, डॉ. योगेश कोळी आकेरकर सर, किशोर शिरोडकर दीपक भोगटे व प्रवीण सावंत संजय नाईक प्रसाद परुळेकर, संगम चव्हाण, प्रिती मयेकर, बापू तळावडेकर उपस्थित होते.विद्या कुलकर्णी यांनी गेले १० वर्षे भारतभर भ्रमण करून विविध पक्ष्यांचे चित्रीकरण केले व त्याचे पुस्तकात रूपांतर करण्यासाठी शोभा कर्णिक व वंदना राजहंस यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक पक्ष्याच्या फोटो सहित त्याची सर्वांगीण माहिती दिली असून एकूण ३५० पक्ष्यांचे तीन भागात संकलन केले आहे. ह्या पुस्तकांद्वारे पक्ष्यांचे सौंदर्य व महत्व त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. या दृष्टीने ही पुस्तके जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवावीत व पक्षांचे मानवी जीवनातील महत्व सर्वाना पटवून द्यावे असे आवाहन लेखिका विद्या कुलकर्णी व शोभा कर्णिक यानी केले.ह्या प्रसंगी डॉक्टर योगेश कोळी ह्यांनी सिंधुदुर्गातील पर्यावरण व पक्षीजीव संवर्धनाच्या मोहिमेची माहिती दिली. सर्वानीच या अत्यंत गरजेच्या अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन केले. संध्या समुद्र यानी ग्रामीण भागात ही पुस्तके देण्याचा उद्देश सफल झाला असून या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच जिल्हयात पक्षीजीवनाविषयी जागृती निर्माण होईल असा आशावाद व्यक्त केला. पक्षीमित्र प्रवीण सावंत यानीही पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने मौलीक असे मार्गदर्शन केले. शाळांसाठी पक्षी जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन, शाळांच्या मुख्याध्यापक / शिक्षकांना स्वच्छंद पुस्तकांचा ३ भागांचा संच देण्यात आला.यावेळी वराडकर हायस्कूल कट्टा, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर,श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे, भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके, विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल,श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, सौ हि भा वरसकर विद्यामंदिर वराड, बॅ, नाथ पै वाचन मंदिर, कट्टा. याना हे पुस्तक संच प्रदान करण्यात आले समारंभाचे संकलन रोटरी क्लब मुंबई माहीमच्या सदस्या, कट्टा येथील रहिवासी रश्मी पाटील यांनी तर किशोर शिरोडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!