विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांचे कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत प्रतिपादन
कु़डाळ (अमोल गोसावी) : बारा बलुतेदारांच्या व्यवसायांना नवसंजीवनी देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. ते कोकण विभागाच्या विश्वकर्मा योजनेच्या बैठकीत कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा येथे बोलत होते.
यावेळी विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी CSC सेंटरवर नोंदणी कसी करावी व योजने विषयी विस्तृत माहिती दिली.हि योजना बारा बलुतेदार समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी योजना आहे.विश्वकर्मा प्रमाणपत्र,प्रशिक्षण,टुल किट,पहिला टप्पा एक लाख ,दुसरा टप्पा दोन लाख कर्ज ५%टक्के दराने मिळणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. समाजामध्ये पारंपरिक व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरु आहेत. समाज व्यवस्था ही बारा बलुतेदार यांच्या व्यवसायावर सुरू होती त्या व्यवसायांना आर्थिक स्थैर्य देऊन पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली आहे.गावगाड्यातल्या अगदी सामन्यातल्या सामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, पंतप्रधान मोदीजी एवढा सूक्ष्म विचार करुन योजना आणतात तर आपण त्या तळागाळापर्यंत पोहचविल्या पाहिजे असे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि नरेंद्र गावकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोकण विभाग संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर,ओरस मंडल अध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, कुडाळ शहर अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर,वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काजी,आंबोली मंडल अध्यक्ष सुधीर दळवी,OBC जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री,कुंभार समाज जिल्हाध्यक्ष नारायण साळवी, विश्वकर्मा मुंबई संयोजक नरेंद्र गावकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












