राज्यस्तरीय इको फ्रेंडली घरगुती गणेश सजावट स्पर्धेत समीर चांदरकर तृतीय !

मसुरे (प्रतिनिधी) : मुंबई तरुण भारत व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमपीसीबी प्रस्तुत महा एमटीबी इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट राज्यस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे कलाशिक्षकसमीर चांदरकर यांनी आपल्या निवासस्थानी साकारलेल्या पर्यावरण पूरक सजावटीला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाला. चांदरकर कुटुंबीयांनी यावर्षी गणेश सजावट करताना कोकणातील मातीचे घर त्यावर वारली पेंटिंग ,गवताचं छप्पर, आणि शेणाने सारवलेली जमीन त्यावर कणा रांगोळी असा देखावा साकारलेला होता. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे १२०० स्पर्धक सहभागी झाले.रोख रुपये २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.हा पुरस्कार सोहळा डॉ. अविनाश ढाकणे, सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,सुश्रुत चितळे अध्यक्ष भारतीय विचार दर्शन,किरण शेलार संपादक, मुंबई तरुण भारत यांच्या प्रमुख उपस्थितीत वडाळा-मुंबई येथे संपन्न झाला.

error: Content is protected !!