खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्तहात साजरी करण्यात आली. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम.अर्चना तळगवकर,श्री संजय राऊळ, सहायक शिक्षिका श्रीम.रेखा लांघी, श्रीम.अलका मोरे, श्रीम.रुपाली पारकर,श्रीम.अमृता ब्रम्हदंडे, श्रीम. काझी मॅडम आदी शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित छान भाषणे सादर केली. तर शाळेचे मुख्याद्यपक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित शालेय मुलांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या शिक्षकांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या व शोर्यच्या गोष्टी शालेय मुलांना सांगितल्या.