लाचखोरी च्या गुन्ह्यात वनपाल अनिल राठोड ला 1 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : लाकूड वाहतूक पास कामासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या नेरूर वनपाल अनिल राठोड याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले. वनपाल राठोड याला लाकूड वाहतूक पास कामी 15 हजारांची लाच घेताना एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. आज राठोड याना जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद करताना पोलीस कोठडी ची मागणी केली. त्यानुसार राठोड याना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

error: Content is protected !!