कनेडी- पामतेल परिसरात बिबट्याचा वावर

कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल गावच्या परिसरात मोठा वावर

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कनेडी- पामतेल नजीकच्या ( शिवडाव गावच्या हद्दीत ) रविवारी रात्री येथून प्रवास करणाऱ्या एका युवकाला रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान रस्त्यावर बिबता दिसून आला. कणकवली तालुक्यातील कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल या परिसरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक वेळा लक्ष वेधुनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या मोकाट सुटलेल्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणार का ? असा सवाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असाही सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

error: Content is protected !!