काळसेत रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे येथे श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन आज दिनांक १५ एप्रिल रोजी करण्यात आले. या शिबीराला गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी २४ रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर , श्री देवी माऊली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष घनश्याम प्रभु , उपाध्यक्ष विपुल माळगांवकर , मंगेश कुलकर्णी , स्वराज्य ग्रूप जिल्हाध्यक्ष साहिल माशेलकर , निलेश बागवे , सागर परब , बबन परब , भगवान काळसेकर यांच्या सह गावातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!