हक्काचा खासदार म्हणून राणेंना निवडून देऊया – संजय देसाई

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या हक्काचा खासदार म्हणून आपले लाडके केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊया. 7 मे रोजी कमळ निशाणी ला मत देऊन भरघोस मतांनी राणेंना लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी जि प सदस्य संजय देसाई यांनी केले. लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्धार सभा असलदे येथील गौरी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी देसाई बोलत होते. संजय देसाई यांनी पुढे बोलताना सांगितले की सुदैवाने प्रथमच आपल्याला नारायण राणे यांना मतदान करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या विभागातून 80 टक्के मतदान हे कमळ निशाणीलाच व्हायला हवे. नारायण राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आजवर विकास झाला. लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे पुन्हा केंद्रीयमंत्री होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सिंधुदुर्गसह कोकणविकासाची नवी सुरवात होणार आहे. त्यामुळे नारायण राणेंना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पाठवूया असे देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!