खारेपाटण बाजारपेठेत महायुतीच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली रॅली

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ,शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षीय महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज शनीवार आठवडा बाजार दिवशी खारेपाटण शिवाजी पेठ अर्थात बाजारपेठेत भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीला खारेपाटण मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे सुपर वॉरियर्स श्री रमाकांत राऊत,शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,राजेंद्र वरुनकर ,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच किशोर माळवदे,माजी पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे,इस्माईल मुकादम,जेष्ठ कार्यकर्ते मधुकर शेठ गुरव तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवा सेनाप्रमुख सुकांत वरूनकर, कणकवली उपतालुका मंगेश गुरव, ग्रा.प.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सौ अस्ताली पवार,सुहास राऊत, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक जेष्ठ कार्यकर्ते मधुकर गुरव,उज्वला चीके,ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले,अमिषा गुरव,शितीजा धुमाळे,मानली होणाळे,दक्षता सुतार, सौ ढेकणे,जेष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र कोरगावकर,शेखर शिंदे,शेखर कांबळे,विजय सावंत,आशा ब्रम्हदंडे आदी प्रमुख पदाधिकारी व भाजप पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण एस टी बस स्थानक ते शिवाजी पेठ अर्थात खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर खारेपाटण अशी भव्य रॅली काढण्यात आली.यामध्ये महिलांसह पुरुष वर्गाची व युवक वर्गाची उपस्थिती अधिक होती.यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने विविध घोषणा देण्यात आल्या.व नारायण राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

error: Content is protected !!