गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत नाही तो गाडण्याची भाषा करतो. अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची कला बाळासाहेबांनी आम्हाला शिकवली आहे.तुम्हालाही सोडणार नाही. 4 जून ला कालच्या सभेचे दमदार उत्तर देऊ.एखाद्या लग्नालाही उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेला कमी गर्दी होती. आशा शब्दांत आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसाठी आयोजित सभेत नितेश राणे बोलत होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव ,सरदेसाई, खा.चंद्रकांत अडसूळ,आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते. सावंतवाडीत पेंग्विन बघण्याची संधी जनतेला मिळाली. आदित्य हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू शोभत नाही. श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की बोलणारा तो आहे की ती आहे. आदित्य हा फॉलटी पीस आहे. चायनीज मॉडेल आहे. बाहेरून चांगले आतून डिफेकटिव्ह. विनायक राऊत आता रडण्याचे काम करतो आहे. विरोधी गटातील खासदार असल्याने विकासात कमी पडू शकलो नाही म्हणतो. संपलेले विषय काढून जनतेला फसवत आहेत. सिडको चा नसलेला विषय काढत आहेत. नारायण राणे खासदार झाल्यावर सिडको फिडको विषय राहणारच नाही. स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी वैभव नाईक यांनी राम मंदिर उदघाटन वेळी वाटलेल्या अक्षतांची कुचेष्टा केली. याचा जाब येथील जनता विचारणार. राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबाना मत मोदींसाहेबाना मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून कमळ निशाणीला मतदान करण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!