नीलम राणेंचे महायुती मंडपात आगमन

11 व्या फेरीअखेर राणे 20847 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अकरावी फेरी पूर्ण झाली असून अकराव्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना एकूण 20847 मतांची आघाडी मिळाली आहे अकराव्या फेरी अखेर नारायण राणे यांना 19,151 तर विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना 17253 मते मिळाली अकराव्या फेरी अखेर नारायण राणे यांना एकूण दोन लाख 11 हजार 360 तर विनायक राऊत यांना एक लाख 90 हजार 513 मते मिळाली असून एकूण 20847 मतांची आघाडी नारायण राणे यांनी घेतली आहे दरम्यान अकरावीची मतमोजणी सुरू असतानाच नारायण राणे यांची पत्नी नीलम ताई राणे यांचे महायुतीच्या मंडपामध्ये आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!