सिंधुदुर्गात राणे तर रत्नागिरीत राऊत आघाडीवर
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत असून चौथ्या फेरीअखेर भाजपा महायुती चे उमेदवार नारायण राणे हे 1724 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फ़ेरित राणेंना 18322 तर विनायक राऊत याना 16568 मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीअखेर राणेंना एकूण 71881 तर राऊत याना एकूण 70157 मते मिळाली आहेत.








