दोडामार्ग (प्रतिनिधी) : शिवसेना नेते मा. खासदार विनायक राऊत यांचा उद्या दि. १४ जून रोजी सकाळी ११:३० वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालया समोरील राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या संकुलातील सभागृहात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महा विकास आघाडी तील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रवीण भोसले, सुरेश दळवी, उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हा प्रमुख इर्शाद शेख, उबाठा संपर्क प्रमुख शैलेश परब, विकास सावंत, राष्ट्रवादीच्या महिला कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब, आदी महा विकास आघाडी चे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.
या संवाद दौऱ्याला महा विकास आघाडी तील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी उपजिल्हा प्रमुख संदिप गवस, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रदिप चांदेलकर, काँगेस तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक यांनी केले आहे.