सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुरंगवणे गावचे सुपुत्र ओम उन्हाळकर याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण पासून जवळ असणाऱ्या कुरंगवणे गावचे सुपुत्र मओम विनोद उन्हाळकर याने नुकतेच नाशिक येथे संपन्न झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप – २०२४ मध्ये ३ किलोमिटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

ओम उन्हाळकर याने यापूर्वीही अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत. राज्य परिवहन मंडळ देवगड आगारातील चालक विनोद उन्हाळकर यांचे ते चिरंजीव असून अखिल भारतीय जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष व भारतीय जैन संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!