लोकसभेप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा – रवींद्र चव्हाण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : लोकसभेच्या विजयाप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी कामास लागा. आपल्या तालुक्यातील मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न करा. निरंजन डावखरे यांना जास्तीत जास्त मिळण्यासाठी मतदारांना मतदान कसे करावयाचे आहे याची माहिती द्या. प्रत्येक गावातील भाजपा पदाधिकारी यांनी याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वेंगुर्लेत आयोजित कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आढावा बैठकित केले.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या दि. २६ जून रोजी होणाऱ्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी वेंगुर्ले तालुक्यातील एकूण मतदार व त्यांचे आपल्या उमेदवारास मतदान याचा तालुका भाजपा पदाधिकारी यांनी कैलेल्या कामाची आढावा बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण येथील साईडिलक्स सभागृतहात संपन्न झाली. या सभेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी, ‘तालुक्यातील एकूण मतदार संख्या, तालुक्यातील मतदार केंद्रे आणि पहिल्या पसंतीचे आपल्या उमेदवारांस होऊ शकणारे मतदान यांची माहिती घेऊन या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकित होणार मतदान हे टीक मार्क करून काकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकित होणार मतदान है टीक मार्क करून होणार आहे. हि टीक मार्क कशी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करून कोणत्याही मतदाराचे मत हे बाद ठरू नये. यासाठी प्रत्येक मतदारांस समजावून सांगा.
यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्र्वेता कोरगांवकर, पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांचा समावेश होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांत पदवीधर संयोजक प्रशांत खानोलकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि. उपाध्यक्ष – अँङ सुषमा प्रभू – खानोलकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, जि.का.का.सदस्य मनवेल व वसंत तांडेल, सोमनाथ टोमके, तालुका सरचटणीस बाबली वायंगणकर, जयंत मोंडकर, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता पडवळ, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल, अभि वेंगुर्लेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, मठ सरपंच रूपाली नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे,पाल सरपंच कावेरी गावडे , मठ उपसरपंच बंटी गावडे , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , रेडी जि.प. मतदार संघाचे माजी सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण जि.प. मतदार संघाच्या माजी सदस्य वंदना किनळेकर, मच्छिमार सेलचे दादा केळूसकर, वेंगुर्ले तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी,सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब , सुजाता देसाई, श्रेया मयेकर, सुरेंद्र चव्हाण, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बाळू प्रभू, रफिक शेख, परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर, लक्ष्मीकांत कर्पे, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर – जगन्नाथ राणे – सुधीर गावडे – संतोष शेटकर – महादेव नाईक , वसंत परब, सुर्यकांत परब, रविंद्र शिरसाठ, तुषार साळगांवकर, अजित नाईक, विजय रेडकर, भूषण आंगवेकर, भुषण सारंग, प्रमोद वेर्णेकर, शरद मेस्त्री, संदिप देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!