कुडाळ (प्रतिनिधी) : तेरसेबांबर्डे ते मांडकुली दरम्यान कर्ली नदीवर नाबार्ड अंतर्गत मोठ्या ब्रिजचे काम जवळ पास 90 टक्के पूर्ण झालेले आहे परंतु ब्रिजला लागून असलेल्या सखल भागात पूरपरिस्थिती मध्ये पाण्याचा मोठा प्रवाह असतो व हा मार्ग पूर्णपणे बंद होतो ब्रिज व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हाकेच्या अंतरावर असूनही आपातकालीन परिस्थितीत शहराशी संपर्क खंडीत होतो. त्यामुळे शाळकरी मुले, कामगार, शेतकरी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे या सर्वांचा विचार करून ब्रिज साठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड या सखल भागात बॉक्स सेल व्हावा यासाठी ग्रामस्थांनच्या वतीने सातत्याने मागणी करत आहेत व तसा यापूर्वीच पत्र व्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व नामदार रविंद्रजी चव्हाण तसेच इतरही लोकप्रतिनिधी कडे सातत्याने केलेला आहे व आज म्हणजेच दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळ पासून माणगांव व लगतच्या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील मांडकुली केरवडे, तुळसुली, घावनळे, मूळदे या गावांतील लोकांचा सकाळ पासूनच शहराशी संपर्क पूर्णपणे तुटला व या मार्गात बॉक्स सेलची उपलब्धता अधोरेखित झाली ही बाब सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळचे उपअभियंता पिसाळ यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यानी तात्काळ सदर भागाची पाहणी केली तसेच कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याशी संपर्क साधला असता बॉक्स सेलची मागणी आपण अग्रक्रमाने मंत्री महोदय यांच्या जवळ केलेली आहे असे सांगितले त्याना पूरपरिस्थिती व पूर्वीचे उपलब्ध असणारे मार्ग पिंगुळी-मांडकुली, साळगाव-केरवडे-मांडकुली, कुडाळ-पावशी या मार्गातील पूरपरिस्थितीतील मर्यादांची माहिती पुन्हा एकदा पूर परिस्थितील फोटो व व्हिडीओ दाखवून प्रसाद धोंड व परशुराम नार्वेकर यांनी दिली व या मार्गावर पूरपरिस्थितीचा विचार करून तातडीने बॉक्स सेल बांधकाम करण्यात यावे असे ग्रामस्थांनच्या वतीने सांगितले.