कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटच्या शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषी माहिती फलक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट च्या अंतिम वर्षातील कृषिकन्यानी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाघेरी येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषी माहिती फलक (Information corner) लावला आहे. तरी याचे उद्घाटन वाघेरी सरपंच अनुजा राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. कृषी माहिती फलक लावण्यासाठी संध्या पाटील, सानिका शिंदे, यशश्री पुजारे, सिद्धी साळसकर, गौरी राणे, प्रियांका सिंगम यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!