सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांची टी सी एस (TCS) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मधील काँम्प्युटर विभागातील १ व मेकॅट्रॉनिक्स विभागातील १ अशा एकुण २ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. काँम्प्युटर शाखेमधुन शुभम कुबडे आणि मेकॅट्रॉनिक्स शाखेमधुन तेजस नाईक या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण नुकतेच जुलै २०२४ मध्ये पूर्ण झाले असून त्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. सदरची निवड प्रक्रिया ही सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आँनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. ही प्रक्रिया अतिशय कठीण समजली जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामिंग स्किल, बौद्धिक क्षमता व शिकत असलेल्या विषयांचे आकलन या सर्व पात्रता फेरींमधुन गेल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी निवड होते.

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीच्या विद्यार्थ्यांना ॲपटेक सोल्युशन, कोल्हापूर या कंपनी मार्फत प्राचार्य डॉ. डी. एस. बडकर यांनी माँक इंटरव्ह्यूची सोय केली त्याचा या विद्यार्थ्यांना फायदा झाला, विद्यार्थ्याची तंत्रशिक्षणाची आवड आणि त्यांना मिळणारे मार्गदर्शन यामुळेच त्यांची आंतरराष्ट्रीय साँफ्टवेअर कंपनीमध्ये निवड होऊ शकते हे दाखवून दिले आहे.
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांच्या प्रयत्नांना संस्थेचे ही तितकेच पाठबळ मिळत आहे.

सदरच्या निवड प्रक्रियेकरीता अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट आँफिसर प्रा. सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, प्राचार्य डाँ. डी एस बाडकर, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!