प्राणघातक हल्ल्याविरोधात महसूल कर्मचारी संघटना आक्रमक ; काम बंद आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीवर तात्काळ कारवाई करा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा महसुल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

महसूल विभागामध्ये सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत .अशावेळी अतिरिक्त कार्यभार आणि त्यामुळे ताणतणाव यामुळे कर्मचारी अगोदरच दबावाखाली वावरत असताना कर्मचाऱ्यांवर प्राणघातक गंभीर दुखापत करण्याच्या हेतूने हल्ला झालेला आहे. या घटनेचा निषेध् करत संबंधित हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी. साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना आज निवेदन देण्यात आले. तसेच संबंधिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महसूल सहाय्यक, तलाठी मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, कोतवाल आणि शिपाई या सर्वांनी आंदोलनाचा इशारा दीला आहे.
या पुढे अशा प्रकारची घटना कुठेही होऊ नये यासाठी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.

संबधितावर कारवाई न झाल्यास आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने, यामध्ये लेखणी बंद, काम बंद, धरणे , बेमुदत रजा आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलन करण्याबाबत भूमिका घेतली जाईल यामध्ये जिल्ह्यामधील सर्वच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, सहाय्यक महसुल अधिकारी शिपाई, वाहन चालक, कोतवाल यांचा देखील समावेश असेल अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. तसेच सद्यस्थितीमध्ये शासनामार्फत वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत असून त्यामुळे देखील कामाचा प्रचंड ताण वाढलेला आहे अशावेळी नागरिकांना सहकार्यासाठी याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
सदर निवेदन देताना जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यामधील महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी दिलीप पाटील, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, सिंधुदूर्ग अध्यक्ष सत्यवान माळवे, संभाजी खाडे कार्याध्यक्ष, शिवराज चव्हाण, सरचिटणीस, विलास चव्हाण उपाध्यक्ष, संतोष खरात तलाठी संघटनेचे दिलीप पाटील, एम.जी.गवस, एकनाथ गंगावणे स्वप्निल प्रभू प्रसिद्धी प्रमुख, अशोक पोळ, रमेश कांबळे, यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!