वायंगणी भाजपच्या वतीने वह्या वाटप

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते निलेश राणे यांचे सौजन्य

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा वायंगणी नं 1, जिल्हा परिषद शाळा ठाणेश्वर भंडारवाडी, जिल्हा परिषद शाळा कालावल येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप करण्यात आले.

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या पुढाकाराने आणि वायंगणी सरपंच रुपेश पाटकर व भाजप कार्यकर्ते रावजी उर्फ चंदू सावंत यांच्या सहकार्याने आज वही वितरण कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सत्यवान सावंत, प्रतीक सावंत, गणेश सावंत, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक टकले, शिक्षिका गोसावी, शिक्षक वसावे, शिक्षिका गावडे, शिक्षक जोशी, शिक्षिका सुर्वे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!