कितीही आडवे आलात तरी दहीहंडी जल्लोषात साजरी करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवावा. जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना चांगला कार्यक्रम बघायला मिळेल, असे आवाहन भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केले आहे.

याबाबत निलेश राणे यांनी ट्विटरवर भाष्य केले आहे. मागच्या १० वर्षात कुडाळ मालवणच्या लोकांना अठराव्या शतकातलं जीवन जगावे लागत आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला हातभार सर्वपक्षीय आणि निष्ठावान म्हणवणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनीही लावावा असा आमचा त्यांना आग्रह आहे, असेही आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!