उभादांडा हायस्कुल अनधिकृत बांधकाम विषयी आंदोलन बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील जमिनीमध्ये बेकायदा अतिक्रमण करून माध्यमिक शाळेचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत सदर संस्थे विरुद्ध व अनधिकृत बांधकामाविरोधी न्यायालयात प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना संबंधित संस्था चालक व माजी विद्यार्थ्यांनी उपोषणासारखी कृती करणे चुकीचे आहे. तरी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी उभादांडा येथील अंकुश वेंगुर्लेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील ग्रामस्थ अंकुश वेंगुर्लेकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,उभादांडा येथील माध्यमिक विद्यालयाची इमारत बेकायदा अनधिकृतरित्या बांधण्यात आलेली आहे. इमारत बांधकाम व जागेसंबंधी प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत, असे असताना संबंधीत संस्थाचालक व माजी विद्यार्थ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची नोटीस दिली आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत वेंगुर्लेकर यांनी निवेदन सादर केले.यामध्ये त्यांनी सदर संस्था चालवीत असलेल्या शाळेस आज पर्यंत कोणत्याही भौगोलिक सुविधा नाहीत. विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली शौचालय वर्गखोल्यांना लागून बांधलेले आहेत. मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाही, शाळेच्या इमारतीकडे येण्या – जाण्यासाठी कायदेशिर रस्ता अस्तित्वात नाही. वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. असे असताना खोटे अहवाल शासनास सादर केले जात आहेत. तरी संबंधीत संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन खोटे अहवाल शासनाला सादर करणाऱ्या संबंधीत संस्थेवर व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणासंबंधी चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या उपोषणाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी अंकुश वेंगुर्लेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!