कणकवली (प्रतिनिधी) : सन २०२४ -२५ चा कणकवली तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,येथे आयोजित करण्यात आला होता. सदर नाट्यमहोत्सव एस. एम. हायस्कूल कणकवलीची ‘AI’ विज्ञान नाटिकेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर नाटिकेमध्ये सोहम ताटे ,काव्या परब, पलक आचरेकर, जानवी रावण, पूर्वा सावंत, भूषण बाणे, संध्या गोधोळकर, शमिका चव्हाण, यांनी अतिशय उत्तम प्रकारे भूमिका साकार केल्या यावेळी तोषाल गावडे, जुनेद मिर या विद्यार्थ्यांनी प्रकाश योजना तर यश बांदिवडेकर, तातोबा चव्हाण या विद्यार्थ्यांनी संगीताची उत्तम साथ दिली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ.एस.एन. तायशेटे, सचिव डी.एम.नलावडे, उपकार्याध्यक्ष एम.ए.काणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन.बोडके, उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान, पर्यवेक्षक जी.ए.कदम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












