कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये गुरुवार दिनांक ११/७/२०२४ ते ५/८/२०२४ रोजी, कॅम्पस रिक्रूटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी ऍपटेक सोलुशन्स कोल्हापूर चे फॉउंडर अँड सीईओ श्री सानिर कित्तूर कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या 10 दिवसीय कार्यशाळेमध्ये पहिले ५ दिवस जय तन्ना यांनी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणारे उपक्रम राबवले त्यामध्ये ऍप्टीट्युड स्किल डेव्हलपमेंट वर ट्रेनिंग दिले. त्या नंतर पुढील 2 दिवस १९ आणि २० जुलै रोजी डॉ. वैशाली शिंदे यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, ग्रुप डिस्कशन यावर ट्रेनिंग दिले व शेवटी २, ३ आणि ५ ऑगस्ट रोजी गौरव सोनी यांनी C प्रोग्रॅमिंग आणि डेटा स्ट्रकचर यावर ट्रेनिंग दिले.
सदर कार्यशाळेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये नोकरी साठी लागणाऱ्या स्किल व त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन दिले. या ट्रेनिंग व कार्यशाळेचा चा फायदा महाविद्यालयातील कॉम्पुटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स इंजिनीअरिंग (AIML) शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना झाला. एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलमताई राणे, ऊपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.
सदर कार्यशाळेसाठी कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस बाडकर ,प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख व महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.













