दक्षेश मांजरेकर सुवर्ण पदकाचा मानकरी !

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्री भगवती हायस्कूल मुणगे चा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी कुमार दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने जिल्ह्यातून 12 वा क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचा मान मिळवला आहे. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा मध्ये दक्षेशने यश संपादन केले आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातून 12वा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल त्याचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका एम बी कुंज, प्रसाद बागवे, एन जी वीरकर, सौ गौरी तवटे, हरीश महाले, सौ कुमठेकर, सुविधा बोरकर यांनी प्रशालेत त्याचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!