आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित व त्यांच्या पत्नी तथा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ फिलोमीना पंडित यांचा १७ सप्टेंबर रोजी सत्कार संपन्न झाला. श्री आई जयंती देवी मंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात पळसंब गांवच्या वतीनेदेखिल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी तसेच पहिली संपूर्ण मालवणी बोलीभाषेतील कादंबरी ‘सुक्या सुंगटाची कढी’ ही नुकतीच प्रकाशित झाली असून यावेळी पंडित दांपत्याने त्या कादंबरीची पुस्तक प्रत श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंबच्या वाचनालयाला भेट म्हणून दिली.
मंडळाच्या वतीने आजीव सभासद परशुराम जाधव व पद्माकर परब यांनी श्री व सौ .पंडित यांचा सत्कार केला तर गांवच्या वतीने देऊ सावंत व देवस्थान मानकरी श्री बबन पुजारे यांनी त्यांचा सत्कार केला
यावेळी ज्येष्ठ कलाकर्मी व जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आजीव सभासद व सल्लागार गिरिधर पुजारे, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत; उपाध्यक्ष अमरेश पुजारे, माजी सरपंच व मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, शेखर पुजारे, बबन पुजारे, प्रमोद सावंत, आजीव सभासद परशुराम जाधव, पद्माकर परब, अनिकेत परब, मोहन पुजारे, दाजी पुजारे, देऊ सावंत, दत्ताराम सावंत, अर्णव गोलतकर, अनुज गोलतकर, आकाश सावंत, सानिका सावंत, किशोर सावंत, स्वरा सावंत, तुषार सावंत व पळसंब ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित पळसंबवासिय उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी लेखक सुयोग पंडित यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. सुयोग पंडित यांनी त्यांच्या मनोगतात पळसंब गांवाचे व श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचे आभार मानले.