पळसंब येथे 9 ऑक्टोबर रोजी श्री भवानी, सिद्धभराडी दशावतार नाट्यमंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग

गणेश महिमा नावाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर

श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंतीदेवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त, श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंबच्या वतीने बुधवार 9 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक 10 वाजता श्री भवानी सिद्धभराडी दशावतार नाट्यमंडळ यांचा “गणेश महिमा” हा दशावतार नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. तरी नाट्यरसिकांनी दशावतार नाट्य प्रयोगचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!