वराडकर हायस्कूल कट्टा येथे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन
चौके (प्रतिनिधी) : किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत माहिती व्हावी तसेच मुलींच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे यासाठी दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वराडकर हायस्कूल कट्टा व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा मधील सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनी साठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात मालवण येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर नूतन गावडे यांनी मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक बदल होत असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करत असताना मुलींनी कोणता आहार घ्यावा, स्वच्छते संबंधी माहिती, मानसिक ताण-तणावाचे नियोजन, आरोग्य संबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपायोजना याबाबत माहिती दिली यावेळी विद्यार्थिनी सोबत चर्चा करताना मुलींच्या समस्यांचे निराकरण केले.
यावेळी स्मिता कम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक यांनी मुलींना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सखी सावित्री समितीच्या सदस्या मयुरी कुबल, सिमरन चांदरकर, छाया कानूरकर, समीक्षा दळवी, नीलम भुजबळ, अमिषा परब, व इंग्लिश मीडियम च्या सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरोडकर विणा यांनी केले.