आचरा येथे 14 ऑक्टोबर रोजी भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा…!

बाबू कदम आणि मित्रमंडळाचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवा निमित्त सोमवार 14 ऑक्टोबर रोजी रामेश्वर मंदिर आचरा येथे विजय उर्फ बाबू कदम मित्र मंडळ आयोजित “भव्य खुल्या एकेरी नृत्य” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा रात्रौ ठिक 9 वाजता सुरु होणार असून यंदा स्पर्धेचे 34 वे वर्ष आहे.

प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रु.21024/- व चषक, द्वितीय क्रमांक विजेत्याला रोख रु. 11024 व चषक, तृतीय क्रमांक विजेत्याला रोख रु 7024 /- व चषक,

उत्तेजनार्थ प्रथमला – रोख रु 2024/- व चषक, उत्तेजनार्थ द्वितीयला – रोख रु. 2024/- व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली असून स्पर्धेचे नियम व अटी आयोजकांकडे राखून ठेवले आहेत.

या भव्य एकेरी नृत्य स्पर्धेसाठी राजन पुजारे, बाबू हडकर, प्रकाश मेस्त्री, दिपक सुर्वे, विनोद गवळी, यल्लाप्पा गुरव, जयदीप पाटील, धुळाजी कर्पे, शांताराम गुरव, सुशल देसाई, भाऊ हडकर, मनोहर शाहा हे प्रयोजक आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विजय उर्फ बाबू कदम 9421574700, अनिकेत घाडी 8551003707, तेजस्विता केळुसकर 9404457835 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!