कणकवली (प्रतिनिधी) : सातरल गावचे जेष्ठ नागरिक व माजी पोलिस पाटील लक्ष्मण सदाशिव राणे (फौजदार) यांचे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी 11.30 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. गावातील जाणते फौजदार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सातरल गावच्या पोलिस पाटीलकीची ४० वर्षे त्यांनी उत्तमरीत्या धुरा सांभाळून सामाजिक सलोखा अबाधित ठेऊन आपली एक प्रतिष्ठा निर्माण केली होती. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेती-वाडी व गुरे शेवटपर्यंत सांभाळली. त्यांच्या जाण्याने गावातील एक जूने व जाणकार व्यक्तिमत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सद्याचे पोलिस पाटील नंदकुमार राणे यांचे ते वडील होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रा. सदस्य व भाजप युवा मोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे यांचे ते काका होत. यांच्या पश्चात मुलगे, मुली, सूना, पुतण्या, नातवंडे असा एकत्रित परिवार आहे.