सभा तुमची दणका आमचा ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा 24 तासांत उलटा परिणाम

ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रज्जाब रमदुल यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल

मुस्लिम समाज विकासाठी नितेश राणेंच्या पाठीशी; ठाकरेंकडून फक्त टीका आणि विकासाच्या नावाने बोंब – रज्जाब रमदुल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उबाठा चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवली येथील प्रचार सभा संपून 24 तास उलटत नाहीत तोवर ठाकरे यांच्या सभेचा उलटा परिणाम दिसून आला आहे. ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रज्जाब रमदुल यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी शेकडो मुस्लिम बांधवांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील मुस्लिम नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. उंबर्डे – कोळपे येथील रज्जब रमदुल यांच्यासह उमर रमदुल चेअरमन चाऀद नवभारत सोसायटी, समीर लांजेकर संचालक नवभारत सोसायटी यांनी हा प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, वैभववाडी तालुका भाजपा सरचिटणीस हुसेन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. एकीकडे नितेश राणेंबद्दल धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा अपप्रचार चिरोधकांकडून होत असताना प्रतिस्पर्धी उबाठा सेनेच्या रज्जाब रमदुल यांनी भाजपात केलेल्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक मुस्लिम बांधव हे नितेश राणेंसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्षप्रवेशनानंतर प्रतिक्रिया देताना रज्जाब रमदुल म्हणाले की शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केवळ टीका करतात. पण विकासाच्या नावाने ठाकरेंची बोंब आहे. त्यांनी विकासाचा कोणताही मुद्दा मांडला नाही. यामुळे जर विकास व पायाभूत सुविधा हव्या असतील तर आमदार नितेश राणे हाच पर्याय आहे.


यावेळी त्यांच्यासोबत सय्यद नाचरे, महमद हनीफ रमदुल, रमजान रमदुल, दस्तगीर रमदुल, महमद रमइल, नतु रमदुल, हुसेन मनाजी, मन्शीर रमदुल, हुसेन नाचरे, खलील रमदुल, अल्लाउद्दीन पाटणकर, महमद थोडगे, समीर नाचरे, आमीर जेठी, आसिफ रमदुल, बिलाल रमदुल, कादीर नाचरे, युसुफ नंदकर, हसन नंदकर, काशिम नंदकर, अब्दुल नाचरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!