शासकीय – निमशासकीय वाहन चालक संघटनेकडून केरकर यांचा हृद्य सत्कार
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालक संजय केरकर हे नियत वयोमानानुसार आज 29 नोव्हेंबर रोजी 36 वर्षांच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त संजय केरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय – निमशासकीय वाहन चालक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय – निमशासकीय वाहन चालक संघटनेचे बाळकृष्ण रणशिंग, संजय तारी, प्रमोद नाईक, मारुती ओंबासे, उदय आचरेकर, पांडुरंग आचरेकर, ज्ञानेश्वर चव्हाण, शेडगे, प्रताप ठाकर आदी उपस्थित होते. संजय केरकर यांनी आपल्या शासकीय सेवाकाळात चोख कर्तव्य बजावत असताना माणुसकी धर्म सुद्धा पाळला. संवेदनशील स्वभावाच्या केरकर यांनी कायम कर्तव्यदक्ष सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्याना व त्यांच्या कुटुंबियांना दीर्घायुरारोग्य लाभो अशा सदिच्छा देण्यात आल्या.












