महिला बचत गटासाठी धिंगरी अळंबीचे उत्पादन, हे रोजगार निर्मितीचे साधन ठरू शकेल !
चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांचा यशस्वी उपक्रम
फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्व. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील, चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी अळंबी लागवड तंत्रज्ञान प्रयोगातून, शिक्षण उपक्रमांतर्गत, धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन घेतले, अळंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून, तिचे मानवी आहारात विशेष महत्त्व आहे. मधुमेह, हृदयरोग इत्यादी व्याधींनी त्रस्त रुग्णांच्या आहारातील अळंबीचा समावेश अत्यंत उपयोगी ठरतो.
आळंबी उत्पादन घेण्यासाठी, उत्पादनाची खोली, वाळलेला चारा, कोळंबीचे बीज इत्यादी गोष्टींची आवश्यकता असून, त्यासोबतच पाच ते आठ टक्के आद्रता व २५ ते ३० डिग्री सेंटीग्रेड अशा पोषक वातावरणात अळंबीचे दर्जेदार हमखास उत्पन्न मिळते. अळंबी उत्पादन घेण्यासाठी थोडी गुंतवणूक व शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन तरुणाई किंवा महिला हा व्यवसाय सुरू करू शकतात. महिला बचत गटात मार्फत हा व्यवसाय सुरू केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.
या उपक्रमात चतुर्थ वर्षाचे भरत पोला, यशश्री पुजारे, सौरभ पुजारी, गौरी राणे, दुर्वेश रावराणे, रामा रेडकर सिद्धी साळस्कर, विघ्नेश रेड्डी, ऋतुराज सावंत, प्रीतम शेळके, हर्ष शेट्ये ,सानिका शिंदे, रितेश शिंत्रे, ओमकार शिरतोडे, ओंकार शिवशरण, प्रियांका सिंघम, कोमल लाड ,अनिकेत तांदळे, अविनाश तोडकर, विराज ओगले, दीपक वाडेकर,आशिष उपाध्ये,सोमनाथ वेटे ,शिवा यनंम, सोमा शेखर गालावा, विजय कुनुक, यश अडोलीकर, तेजस गोस्वामी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य संते, विषय शिक्षिका प्रा.कविता पुजारे ,प्रा. तेजस पाटील,प्रा. लामतुरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दीपेश मराठे व मिताली मराठे आणि विद्या राणे- पाटील यांचे सहकार्य लाभले.














