कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली 46 वर्ष सातत्याने सांस्कृतिक संवर्धनाचे काम करत आहे. नाथ पै एकांकिका स्पर्धा, शास्त्रीय संगीत कार्यशाळा, संगीत महोत्सव, प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांच्या नाट्य महोत्सव यासारख्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असून याबरोबरच संस्था स्वतःची नाट्य निर्मिती ही करत आली आहे. संस्थेने आजवर 26 एकांकिका व 18 दोन अंकी नाटकांची निर्मिती केली असून या निर्मितीला राज्य नाट्य स्पर्धेबरोबरच विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झाली आहेत.केवळ पारितोषिक मिळवण्यासाठी धडपड न करता वेगवेगळ्या प्रकारची नाटके करून पाहण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. यापूर्वी अतुल पेठे यांनी कणकवली येथे कार्यशाळा घेऊन मी माझ्याशी या नाटकाची निर्मिती केली होती व त्याचे 48 प्रयोग महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर केले होते त्याच धर्तीवर संस्था यावर्षी गोवा येथील तरुण दिग्दर्शक श्री केतन जाधव यांच्यासोबत नवीन नाटकाची निर्मिती करणार आहे. तसेच संस्थेचे ज्येष्ठ दिग्दर्शक श्री रघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाखाली सुद्धा नाटक बसविले जाणार आहे.
त्यासाठी कलाकारांची निवड कार्यशाळेच्या माध्यमातून केली जाणारा असून संस्थेने दिनांक 26,27,28 एप्रिल 2024 रोजी नाट्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही कार्यशाळा संस्था नव्याने निर्माण करत असलेल्या नाटकासाठी असून या कार्यशाळेत अभिनेते, अभिनेत्री, गायन, वादन नृत्यकला अवगत असलेले, तसेच लाईट,संगीत इत्यादी तांत्रिक अंगांची आवड असणाऱ्या कलाकारांना सहभागी होता येईल. ही कार्यशाळा गोवा येथील तरुण दिग्दर्शक अभिनेते केतन जाधव घेणार असून. त्यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकाची निर्मिती केली जाणार आहे. कार्यशाळेत आपल्या नावाची नोंदणी ऑनलाइन करणे आवश्यक असून या कार्यशाळेत 17 वर्षा वरील व्यक्तींना सहभागी होता येणार असून कार्यशाळेसाठी 500 ₹ फी आकारली जाईल. कार्यशाळा फी 9422374060 या नंबर ला Gpay करावी व त्याचा स्क्रीनशॉट फॉर्म मध्ये अपलोड करावा. कार्यशाळा सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत घेतली जाणार असून, प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2024 आहे.कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री. शरद सावंत यांच्या मोबाईल नंबर 9422584054 वर संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर देसाई यांनी केले आहे.