देवगड (प्रतिनिधी): सामान्य माणसाचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम शिवाजीमहाराजांनी केले आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन महाराष्टड्ढाच्या ख्यातनाम व्याख्यात्या अॅड.वैशाली डोळस यांनी देवगड येथे केले. देवगड शहर समितीच्यावतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम देवगड तहसिल कार्यालय ते गार्डन यांच्यामधील पटांगणात संपन्न झाला.यानिमित्त देवगड कॉलेजनाका ते तहसिल कार्यालय अशी भव्य दिव्य भीमरॅली ढोलताशांच्या गजरात, शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात काढण्यात आली.अभिवादन रॅलीनंतर तहसिल कार्यालयानजिक पटांगणात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा साक्षी प्रभू व उपनगराध्यक्षा मिताली सावंत आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर शिवराय ते भीमराय विषयावर अॅड.वैशाली डोळस यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मनिषा जामसंडेकर, हर्षा ठाकूर, समितीचे अध्यक्ष के.एस्.कदम, कार्यवाह दिलीप कदम, पुजा विलास जाधव, अॅड.एस्.एस्.साळवे, देवगड महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सुरेश कुर्लीकर, प्रा.निलेश वानखेडे, प्रा.श्रीकांत सिरसाठे, सुर्यकांत साळूंके, प्रकाश जाधव, आनंद देवगडकर, सुरभी पुरळकर, विश्वनाथ पडेलकर, तन्वी पडेलकर आदी उपस्थित होते. अॅड.डोळस शिवराय ते भीमराय या विषयावर बोलताना म्हणाल्या छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीवर, वर्णावर, प्रेम केल नाही तर सामान्य माणसावर प्रेम केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सामान्य माणसांचे स्वराज्य होते.शिवाजीमहाराजांसारखा सार्वभौम राजा निर्माण करण्याचे कार्य राष्टड्ढमाता जिजावूंच्या संस्कारात व शिवाजीमहराजांच्या पराक्रमात आहे.सामान्यातून असामान्यतेचा प्रवास शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन थोर महापुरूषांमध्ये आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांनी संविधानातून माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला.महिलांना समानतेचा हक्क मिळवून दिला तर महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडविली म्हणून या थोर महापुरूषांच्या विचाराचे आचरण करून प्रगती साधा असे आवाहन अॅड.डोळस यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, के.एस्.कदम, तन्वी चांदोस्कर आदी मान्यवरांनी विचार मांडले.सुत्रसंचालन सुर्यकांत साळूंके, प्रास्ताविक दिलीप कदम यांनी केले.यावेळी आरंभ नव्या युगाचा हा संगीतमय भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सामान्य माणसाचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम शिवाजीमहाराजांनी केले – अॅड.वैशाली डोळस












