ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील हिवाळे साडेवाडी येथील विठ्ठल भगवान शिंदे वय २१ या तरुणाविरुद्ध मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ डिसेंबर २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत हा गुन्हा घडला. कुडाळ तालुक्यातील ओरोस जैतापकर कॉलनी येथे ही घटना घडली असून याबाबत मालवण तालुक्यातील आचरा पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा गुन्हा सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने ही तक्रार तपासासाठी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता अंतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील करीत आहेत.












