नडगिवे येथे आदर्श मतदान केंद्र मतदारांसह जनतेचे आकर्षण

लोकशाहीचा उत्सव मतदानाचा हक्क बजावून साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या तालुक्यातील नडगीवे या गावात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर सजावट करून आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. तसेच मतदारांमध्ये जनजागृती करणे व नागरिकांना निर्भयपणे मतदानाचा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी जबाबदार पूर्वक मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा केला.

नडगीवे जि.प.शाळा मतदान केंद्र – ४/१७ येथे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर माडाच्या झावळांची आकर्षक कमानी करण्यात आली होती. याबरोबरच परिसर लोकशाही पोषक वातावरण निर्माण करण्यात आले होते. यावेळी मतदान केंद्र अध्यक्ष अनिल पाटील, उमेश रघुनाथ मोटे, कोमल राजेंद्र कुरणे, प्रियेशा प्रवीण अमृते, पोलिस शिपाई – शिवहरी दराडे, आकाश मांजरेकर, ऋतुजा आंबेरकर, बी एल ओ संदीप कदम,पोलिस पाटील जितेंद्र मण्यार,मंडळ अधिकारी एस आर बावलेकर, आदी उपस्थित होते. नडगीवे जि.प.शाळा नं.१ येथे आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यासाठीं खारेपाटण सर्कल बावलेकर व प्राथमिक शिक्षक व बी एल ओ संदीप कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!