प्रज्ञा ढवण यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रज्ञा प्रदीप ढवण यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते. महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी ओरोस येथील परेड ग्राऊंडवर ढवण यांना सन्मानपूर्वक पुरस्कारस्वरूप रक्कम 10 हजार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महिला बाल विकासासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांना प्रोत्साहन म्हणून राज्य शासनाच्या वतीने जिल्हा आणि राज्यस्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रज्ञा ढवण याना सन 2015 – 16 सालसाठी चा पुरस्कार जाहीर झाला होता. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!