आभाळमाया ग्रुपने जपली पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी

रायगड येथून बेपत्ता झालेल्या वृद्ध इसमास घडवली नातेवाईकांची भेट

चौके (प्रतिनिधी) : रायगड , माणगांव तालुक्यातील साई गावातील सुभाष भीकु मोरे , वय वर्षे ६५ ही वृद्ध व्यक्ती पनवेल येथुन दि. २९ एप्रिल पासुन बेपत्ता झाली होती.

दरम्यान मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडीतील युवकांना ही मनोरुग्ण व्यक्ती निदर्शनास आल्यानंतर ३० तासाच्या अथक प्रयत्नातुन त्या वृद्ध व्यक्तीस त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या कार्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य अमित चव्हाण,

रुपेश चव्हाण, कु. स्वप्निल चव्हाण, कु. पवन चव्हाण व आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी अखेर दि.३ मे.२०२३ पहाटे ४.०० वाजता त्या वृद्धाची व नातेवाईकांची भेट घडवुन आणून कायदेशीर मार्गाने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या कार्यात मालवण पोलीस कर्मचारी आणि पणदुर येथील संविता वृद्धाश्रम यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

error: Content is protected !!