आविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र इंडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी झिलू गोसावी यांची निवड

चौके (प्रतिनिधी) : सामाजिक, शैक्षणिक, कला या क्षेत्रात उत्तम रित्या कार्य करणारे झिलू गोसावी याना मालवण येथील कुंभारमाठ जानकी हॉटेल येथे आविष्कार फाऊंडेशन च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आविष्कार फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते निवड पत्र देऊन सन्मानित केले व आविष्कार फाऊंडेशन चा जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर केले. या त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. या निवडी नंतर झिलू गोसावी म्हणाले की या संस्थेच्या उन्नतीसाठी जिल्ह्यातील सर्व सदस्य यांच्या सहकार्यने प्रयत्न केले जातील तसेच या संस्थेचे कार्य हे राज्य, देश या पुरते मर्यादित नसून अन्य देशांतही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!