नांदगाव मध्ये कमलेश मोरये मारहाण प्रकरणी रविराज मोरस्कर वर गुन्हा दाखल

कणकवली (आनंद तांबे) : नांदगाव तिठा येथील कमलेश सुरेश मोरये (३९) यांचा मोबाईल चोरून नेत मारहाण केल्याप्रकरणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, भूपेंद्र मोरजकर, केदार खोत (तिघेही राहणार नांदगाव सीसयेवाडी) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद कमलेश मोरये यांने पोलीस ठाण्यात दिली आहे.

कमलेश मोरये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी नांदगाव तिठा येथील सुकमन बार येथे उभा होतो. त्यादरम्यान भूपेंद्र मोरजकर, रविराज मोरजकर, केदार खोत हे तेथे येत शिवीगाळ करू लागले. तसेच केदार खोत यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली, त्यावेळी भूपेंद्र मोरजकर याने माझा मोबाईल चोरून नेला. त्यादरम्यान माझे वडील सुरेश मोरये हे मध्यस्थी करण्यासाठी तेथे आले असता भूपेंद्र मोरजकर याने त्यांच्या मानेवर लाकडी बांबूने मारहाण करून दुखापत केली तसेच शिवीगाळ केली असे म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस चंद्रकांत झोरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!