उंडील ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता

ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची तुकाराम नर यांची मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील ग्रामपंचायत क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता झाली आहे. याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई करावी. अन्यथा १८ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनोहर तुकाराम नर या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.

देण्यात आलेल्या निवेदनात श्री नर यांनी, योजनेच्या पाण्याची कागदोपत्री एका ठिकाणी दाखविण्यात आली असून प्रत्येक्षात ती दुसऱ्या ठिकाणी उभारली आहे. ही योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. काम अपूर्ण आहे. तरीही ठेकेदाराला मोबदला अदा करण्यात आलेला आहे. याची आपल्या आदेशाने अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ठेकेदाराला काळया यादीत टाकावे. योजनेसाठी ४७ लाख रुपये दाखविण्यात आले होते. त्यानंतर त्यात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम कोठे व कशासाठी वापरण्यात आली, याचा शोध घेण्यात यावा. कामाला स्थगिती देण्यात यावी. या प्रमाणे कार्यवाही न झाल्यास १८ मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!