कलमठ मधील तरुणाने घेतली जानवली नदीपात्रात उडी

तरुणाला मुका मार ; उपचारासाठी रुग्णालयात हलवले

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात लगत असलेल्या जानवली नदीवरील पुलावरून कलमठ मधील एका तरुणांने नदीपात्रात उडी मारली. हा धक्कादायक प्रकार काहींनी पाहिला. नागरिकांनी नदीपात्रात धाव घेत त्या तरुणाची विचारपूस केली. व त्याला नदीपात्रा बाहेर काढले. हा तरुण कलमठ मधील असून नदीत त्याने उडी मारण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी जानवली पुलावरून सुक्या नदीपात्रात उडी मारल्याने त्याला मोठ्या प्रमाणावर मुका मार बसला आहे. घटनेची माहिती मिळतात युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह अनेकांनी नदीपात्रात जाऊन त्या तरुणाला बाहेर आणले. व उपचाराकरता दाखल केले. या घटनेमुळे जानवली पुलावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

error: Content is protected !!